महाराष्ट्र सरकारला धक्का; अखेर सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे

0

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र मुंबई पोलीस या घटनेचा तपास करत असल्याने महाराष्ट्र सरकारने तपास सीबीआयकडे देण्यास नकार दिला होता. मात्र बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारने ती मागणी मान्य केली असल्याने हा तपास अखेर सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा धक्का मानला जात आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वकील श्याम दिवान यांनी सांगितले की, मेहता यांनी जे काही सांगितले तो या सुनावणीचा विषय नाही. न्यायालयाने याचिकेवर लक्ष घालावे. रियाने या सर्व चौकशी प्रकरणावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. बिहारमध्ये नोंदवलेला एफआयआर हा कायद्यानुसार नाही. यामुळे न्यायालयाने हे रोखावे, अशी मागणी दिवान यांनी केली आहे.