महाराष्ट्र सर्वात जास्त सौरऊर्जा निर्माण करणारा प्रदेश बनणार

0

‘सौरऊर्जा आणि इन्व्हर्टरमधील नवे तंत्रज्ञान’ यावरील चर्चासत्रातील मत

पुणे : सौरऊर्जेचे महत्त्व महाराष्ट्राला पटले असून आगामी काळात महाराष्ट्र हा सर्वात जास्त सौरऊर्जा निर्माण करणारा प्रदेश बनणार आहे. सौरऊर्जेचे महत्त्व आणि किफायतशीरपणा ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती निर्माण केली पाहिजे, असे महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
इनो सोलर एनर्जी प्रा.लि.आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयोजित ‘सौरऊर्जा आणि इन्व्हर्टरमधील नवे तंत्रज्ञान’ या विषयावरील चर्चासत्र सोमवारी (दि.14) मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या सुमंत मूळगांवकर सभागृहात पार पडले.

यावेळी स्टिफन थिएरफेल्डर (मुख्य कार्यकारी अधिकारी, रेफुसोल, जर्मनी), हरप्रीत सिंग धीर (साउथ एशिया बिझनेस हेड), प्रदीप कुलकर्णी (उपाध्यक्ष, महाराष्ट्र सोलर असोसिएशन), उन्मेश जगताप (मुख्य कार्यकारी अधिकारी, इनो सोलर एनर्जी प्रा.लि.) उपस्थित होते. इनो सोलर एनर्जी सेव्हिंग आणि सोलर एनर्जीमध्ये कार्यरत असून रेफुसोलबरोबर त्यांनी करार केला आहे, असे उन्मेश जगताप यांनी सांगितले.

भारताला सौरऊर्जेचे वरदान

स्टिफन थिएरफेल्डर म्हणाले, भारताला सौरऊर्जेचे वरदान असून गुणवत्तापूर्ण जर्मन इन्व्हर्टर वापरले तर या सौरऊर्जेचा परिणामकारक वापर भारतीयांचे जीवन बदलून टाकेल.
हरप्रीत म्हणाले, सौरऊर्जेच्या दूरगामी वापरासाठी गुणवत्तेची हमी देणारी उत्पादने वापरणे हितकारक असते. त्यात तडजोड केली की नंतर ग्राहकालाच त्रास होतो. या चर्चसत्राला सौरऊर्जा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.