महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे गुणगौरव सोहळा

0

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे रविवारी राधाकृष्ण मंगल कार्यालयात सोनार सुवर्णकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या सुमारे १६५ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, भाजप गटनेते भगत बालाणी, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, नगरसेविका रंजना वानखेडे, माजी नगरसेविका लता मोरे, वैशाली विसपुते, भिकन वानखेडे, राजेश वानखेडे, सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव, रामदास निकुंभ, श्याम भामरे आदी मान्यवर उपस्थित होते. रतनकुमार थोरात यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष अरुण वडनेरे, विजय वानखेडे, राजेंद्र विसपुते, संजय पगार, उत्तम नेरकर, सुरेश सोनार, रत्नाकर दुसाने, गोकुळ सोनार यांनी सहकार्य केले. याप्रसंगी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष संजय विसपुते यांनी शहरात मेडिकल हब उभारले जात असून त्यास संत शिरोमणी नरहरी महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. याला ना. गिरीश महाजन यांनी अनुकुलता दर्शवली.