जळगाव : राज्य शासनाच्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने महाराष्ट्रातील नव उद्योजक, विद्यार्थी आणि स्टार्टअप यांना कल्पना मांडण्यासाठी काढण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप अंतर्गत उदया शनिवार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दिवसभराची कार्यशाळा (बूटकॅम्प) आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील तरुणांच्या नवउद्योजकीय संकल्पनाद्वारे नवीन उद्योग सुरु व्हावेत व हे तरुण आत्मनिर्भर व्हावेत यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा काढण्यात आली आहे. 4 ऑक्टोबर पासून यात्रेला प्रारंभ झाला असून 3 नोव्हेंबरला नागपूर येथे या यात्रेची सांगता होणार आहे. जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात या यात्रेचा बूटकॅम्प होणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी सिनेट सभागृहात होणाज्या या कार्यशाळेत धुळे येथील उद्योजक श्री.जी.बी.मोदी हे प्रमुख मार्गदर्शन करणार असून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी असतील. उद्योजक आनंद कोठारी आणि धर्म सांखला हे देखील संवाद साधणार आहेत.
विद्यापीठाशी संलग्न आजी-माजी विद्यार्थी तसेच नाविन्यपूर्ण कल्पना असणारे नागरिक देखील या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतील. नवीन उद्योग उभारणीच्या नाविन्यपूर्ण कल्पना यावेळी त्यांना मांडता येणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रा.भूषण चौधरी (मो.नं.98234 52539), प्रा.विकास गीते (मो.नं.94200 67321) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.