‘महारेरा’च्या अध्यक्षपदी गौतम चटर्जी

0

मुंबई । खाजगी बिल्डरांकडून घर खरेदी करणार्‍या ग्राहकांची फसवणूक होवू नये आणि ग्राहकाला कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने स्थावर व नियमन कायदा लागू केला. त्यानुसार राज्यातील घर खरेदी करणार्‍यांना संरक्षण देण्यासाठी महारेरा कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारने सुरु केली असून, या महारेराच्या अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी गौतम चटर्जी यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यासाठी मंत्रालयातील 6 व्या माळ्यावरील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महारेरा प्राधिकरणच्या अध्यक्षपदाची शपथ राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी गौतम चटर्जी यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण विभागातील अनेक अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर महारेरा प्राधिकरणावर इतर आणखी दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून सदस्यपदी आयपीएस अधिकारी विजय सतबीर सिंह आणि आयएएस अधिकारी कपाडीया यांची 1 जून 2017 रोजी नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.