नवापूर । श्रीमती प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे उपमुख्याध्यापक एस.एम. महाले व पर्यवेक्षक जी.एस. साखरे यांच्या सेवापुर्ती सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद वाघ होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती एस.एम. महाले, कल्पना महाले, आम्रपाली महाले व जी.एस.साखरे यांच्या सोबत पुष्पाताई साखरे, उमेश साखरे, जावाई सचिन एखंडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य संजीवकुमार पाटील, डी.बी.बेन्द्रे, ए.बी.थोरात, हिरालाल चौधरी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य मिलिंद वाघ यांच्या हस्ते महाले व साखरे यांचा परिवारासह सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ए.बी.थोरात, आर. एम. भट, एस.डी. शिरसाठ, एम.जे.सोनवणे, जे.ए. पाठक, पी.जे. शिरसाठ, अनिल वळवी, मनोज पाटील, सचिन एखंडे, नारायण मराठे, जयश्री चव्हाण व निर्मला वसावे या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक डी.बी. बेन्द्रे यांनी तर सूत्रसंचालन व आभार बी. एम.सैंदाणे यांनी मानले..