राजगुरूनगर : जिल्हा व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये 75 खटले तडजोडीसह विविध खटल्यात तब्बल 2 कोटी 13 लाख 32 हजार 648 रुपयांची वसुली झाली आहे. राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 8) राष्ट्रीय महालोक अदालतीचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश एन. के. बह्मे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा सहन्यायाधीश ए. एस. सलगर, के. एच. पाटील, एस. सी. तायडे, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. बी. देशमुख, एच. डी. देशींगे, पी. डी. देवरे, एस. एन. पाटील, सरकारी वकील रजनी नाईक, विधी सेवा समितीचे महादेव कानकुरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दिलीप करंडे, उपाध्यक्ष वैभव कर्वे, पोपटराव तांबे, बी. एम. सांडभोर, अरुण मूळूक, प्रदीप अमाप, गोरक्ष शिंदे, माणिक वायाळ, आदिनाथ कड, सुभाष कड, सुलभा कोटबागी, विठ्ठल नाणेकर, संदीप रेटवडे, विजय शिंदे, रेश्मा भोर यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षकार, बँक, ग्रामपंचायती नगरपरिषद कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. बी. देशमुख म्हणाले की, प्रत्येक माणसाला न्याय मिळावा यासाठी विधी सेवा समिती काम करीत आहे. कमीत कमी वेळेत पक्षकाराला न्याय देण्याचा प्रयत्न लोकअदालत मधून आपण करीत आहोत. पक्षकारांना लोक न्यायालयाचे महत्त्व वकिलांनी पटवून द्यावे. जास्तीत जास्त खटले निकाली काढावेत. लोकन्यायालय यशस्वी करून पुणे जिल्ह्यात राजगुरूनगर कोर्टाचा क्रमांक आणावा, असे त्यांनी नमूद केले.
हे देखील वाचा
वकील पॅनल सदस्य म्हणून के. के. रिठे, एस. व्ही. दौंडकर, बी. डी. गोरे, आर. एस. गायकवाड, पी. डी. गारगोटे, एस. ए. माळी यांच्यासह न्यायालयीन कर्मचार्यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा भोगडे, सूत्रसंचालन उपाध्यक्ष वैभव कर्वे, तर मोहिनी केदारी यांनी आभार मानले.