‘महाविकासआघाडी’चे सरकार टिकणार नाही: नितीन गडकरी

0

मुंबई: राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. आज तिन्ही पक्षात बैठक सुरु आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी महाविकासआघाडीवर भाष्य केले आहे. महाविकासआघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही असे विधान केले आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही वेगवेगळ्या विचाराचे पक्ष आहे. तिन्ही पक्षाचे विचार दोन टोकाचे असल्याने ते एकत्र सरकार चालवू शकत नाही, त्यामुळे महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळणार नाही असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे.

शिवसेनेचे विचार कॉंग्रेसला आणि राष्ट्रवादीला कधीही पटलेले नाही. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे विचार कधीही सेनेला आवडलेले नाही त्यामुळे ते एकत्र राहूच शकत नाही असा दावा गडकरी यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आजपर्यंत एकत्र होती, मात्र आज दोन्ही पक्ष दूर गेल्याचे कारण तुम्हाला माहित आहे असेही गडकरी यांनी म्हटले आहे.