महाविकास आघाडीचे आज पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; बलाढ्य विरोधी पक्षासमोर कसोटी !

0

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. बलाढ्य अशा विरोधी पक्षासमोर सरकारची कसोटी लागणार आहे. या सरकारपुढे प्रश्नही अनेक आहे. सत्तेत येण्यापूर्वी सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन, २५ हजार हेक्टरी मदतीचे आश्वासन यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. सीएएविरोधातील आंदोलने, एल्गार प्रकरणाचा तपास, कोरेगाव-भीमा या मुद्यांवर सत्ताधारी तसेच विरोधक दोन्ही बाजूंकडील सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे.

या अधिवेशनात राष्ट्रीय मुद्दे गाजण्याची चिन्हे आहेत. महाविकास सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी, जलयुक्त शिवार बंद करण्याची चर्चा, कायदा-सुव्यवस्था, स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्ताव इत्यादी मुद्दे विरोधक मांडण्याची शक्यता आहे.