पुणे: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वीचे राजकारण संपूर्ण देशाला ज्ञात आहे. दरम्यान आज पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकार येण्यामागील पार्श्वभूमीवर भाष्य केले. महाविकास आघाडीचे सरकार हे पवारांचा चमत्कार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) सर्वसाधारण सभा झाली. यासभेला शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अजित पवार हे उपस्थित होते.
कमी आमदार असतानाही भाजपवर मात करून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात बनले हा चमत्कार पवारांनी घडविला असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून काम करणार असून शेतकऱ्यांना कोणत्याही गोष्टींची कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.