महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार; खडसेंची भविष्यवाणी !

0

पंढरपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे हे सरकार आहे. भिन्न विचारसरणीचे हे सरकार असल्याने पाच वर्ष टिकणार नाही असे सातत्याने भाजपकडून सांगण्यात येत असते. मात्र भाजपचेच ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हे सरकार पाच वर्ष टिकेल अशी भविष्यवाणी वर्तविली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षाचे राजकीय विचार सोडून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर सरकार टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. यामुळे सरकार ५ वर्षे टिकू शकणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी खडसे पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रत्येक पक्षाचे धोरण वगळे असते. यामध्ये शिवसेना हिंदूत्व तर काँग्रेस पुरागामी असे असतानाही ते एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. त्यांना ५० दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या ५० दिवसांच्या कालावधीत त्यांनी एकमेकांवर अनेक टीका केली आहेत. त्यांची सरकार चालवण्यासाठी तीन पायाची शर्यत सुरू आहे. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाचे विचार सोडून एकत्र येत असतील तर सरकार टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. यामुळे सरकार ५ वर्षे टिकू शकते असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.