महाविकास आघाडीच्या सरकारचे उद्या मंत्रिमंडळ विस्तार !

0

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचे पहिले मंत्रिमंडळ विस्तार उद्या २४ डिसेंबर रोजी होणार आहे. यात शिवसेनेकडून १३, राष्ट्रवादीकडून १३ तर कॉंग्रेसकडून १० आमदारांना मंत्रीपद मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 अशा 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. 28 नोव्हेंबरला शपथविधी झाल्यानंतर, 12 डिसेंबरला खातेवाटप झाले होते. उद्या दुपारनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित झाले आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली होती. दोन्ही पक्षांची विस्ताराची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसकडून कोणाला मंत्रिपदं द्यायची यावरुन खल सुरु आहे. काँग्रेसचे नेते आज सोमवारी दिल्लीला गेले आहेत.