मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री शंकरराव गडाख यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यात ते विजयी झाले होते. महाविकास आघाडीमध्ये त्यांना मंत्रीपद देण्यात येऊन त्यांच्याकडे जलसंधारण खात्याची जबाबदारी देण्यात आली.
आज शिवसेना पक्ष प्रमुख, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून शिवसेना पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.@ShivSena @mieknathshinde @Subhash_Desai @NarvekarMilind_ @AUThackeray pic.twitter.com/UQsQT57Bz8
— Shankarrao Gadakh Patil (@GadakhShankarao) August 11, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी शिवसेनेचे सचिन मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर यांच्या मध्यस्थीने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नगर जिल्ह्यात शंकरराव गडाख यांचे मोठे नाव आहे. राजकीय वजनही मोठे आहे.