महाविकास आघाडीला मोठा झटका: अमरीश पटेल विजयी

0

जळगाव: विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ आणि विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची आज गुरुवारी मतमोजणी सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या विरोधात एकमेव भाजप असल्याने महाविकास आघाडीचा विजय निश्चित मानला जात होता.

मात्र धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार  माजी मंत्री अमरीश पटेल विजयी झाले आहे. हा महाविकास आघाडीच्या तीनही पक्षासाठी धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे 115  मते फुटल्याने अमरीश पटेल यांच्या विजय झाला आहे.

अमरीश भाई पटेल यांनी काँग्रेसमधून गेल्यावर्षी विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य असताना भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्याने विधान परिषदेचे सदस्यत्व पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यामुळेच ही पोट निवडणूक घेण्यात आली.