महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव थोड्याच वेळात

0

मुंबई: मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या सरकारची ‘अग्नीपरीक्षा; आहे. महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जाणार आहे. आमदार फुटू नये म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकार कडून समर्थनार्थ १७० आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडी मिळून १५४ सदस्य संख्या होत असून, बहुजन विकास आघाडीचे तीन, समाजवादी पार्टी, प्रहार जनशक्तीचे प्रत्येकी दोन आणि शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रत्येकी एक आमदार आणि सात अपक्ष आमदार सरकारच्या पाठिशी आहेत. असे एकूण १७० आमदारांचा आपल्याला पाठींबा असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या आमदारांना सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आपल्या आमदारासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात पोहोचले आहे. आपल्या आमदारांना विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहे.