रावेरात भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचा जोरदार हल्लाबोल
रावेर: जिल्हात फक्त दोन गावांच्या काही शेतक-यांना कर्जमाफी झाली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. नवीन काहीही न करता मागील सरकारच्या काळातील लोकोपयोगी योजना बंद पडण्याचेच काम या सरकारकडून होत आहे. हे महाविकास आघाडी सरकार नसून स्थगिती सरकार आहे असा जोरदार हल्लाबोल जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी केला. रावेर येथे भाजपने शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते.
सर्वत्र महिला असुरक्षित आहेत. मतदारांचा विस्वासघात करून निर्माण झालेले सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचेही जावळे यांनी सांगितले. आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना प्रल्हाद पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदकीशोर महाजन, जि.प.सदस्य कैलास सरोदे, नंदाताई पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, प.स.सभापती जितेंद्र पाटील, उपसभापती पी.के.महाजन, भाजपा जिल्ह्या उपाध्यक्ष पदमाकर महाजन, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, प.स.सदस्य योगिता वानखेडे, जुम्मा तडवी, कविता कोळी, शिवाजीराव पाटील, सरचिटणीस महेश चौधरी, वासुदेव नरवाडे, नगरसेविका शारदा चौधरी, शहराध्यक्ष दिलीप पाटील, उमेश महाजन, मनोज श्रावग, संजय माळी, संदीप सावळे, भास्कर बारी, सी.एस पाटील आदी उपस्थित होते.