महावितरणची रावेर शहरात वीज चोरट्यांविरोधात धडक मोहिम : कारवाईने उडाली खळबळ

Electricity thieves on the radar: Action against 22 people in Rawer Stirs Excitement रावेर : वीज चोरट्यांविरोधात महावितरणने धडक मोहिम राबवण्यास सुरूवात केली असून शहरात वीज चोरी करणार्‍या 22 जणांविरुध्द कारवाई करण्यात आल्याने वीज चोरट्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कारवाईने उडाली खळबळ
रावेर शहरातील राजीव पाटील नगर, रोकडा हनुमान नगर, विश्वकर्मा नगर आणि शिक्षक कॉलनी परीसरात उप कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांचा मार्गदर्शनाखाली वीज चोरट्यांविरोधात कारवाई करण्यात आली. 22 लोकांवर कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी सहा.अभियंता दिलीप सुंदराणी, समीर तडवी,गणेश दहीभात, श्रीकृष्ण बर्कुल, मुकेश ठाकरे, संतोष जाधव व इथर कर्मचारी सतीश चौधरी, भिका साळुंखे, चंद्रकांत ठाकूर, चेतन भरते, अरुण माळी, कल्पेश पाटील, महेश चौधरी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.