महावितरणच्या ग्राहकांचा ऑनलाईनकडे कल

0

ठाणे । ठाणे जिल्ह्यात डिजिटल पेमेंटकडे नागरिकांचा ओढा वाढत असून विशेषत महावितरण कंपनीची वीज बिले ऑनलाईन भरण्याकडे कल आहे असे अधीक्षक अभियंता ठाणे सर्कल संतोष वाहाने यांनी माहिती दिली. डिजिटल पेमेंटबाबत जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्याकडील नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सांगितले की सुमारे 27 ते 28 टक्के ग्राहक ऑनलाईन बिल अदा करीत असून ही संख्या पुढील काळात वाढणार आहे. विशेष म्हणजे उच्च दाब वीज ग्राहक जे की व्यवसायिक किंवा उद्योग आहेत त्यांचेही प्रमाण यात समधानकारक आहे. ठाणे जिल्ह्यात महावितरणचे भांडूप, मुलुंड, ठाणे एक, ठाणे दोन, ठाणे तीन, वागले इस्टेट असे 6 डिव्हिजन येतात. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर 2017 या 8 महिन्यातील आकडेवारी त्यांनी सादर केली.

विभागनिहाय ग्राहकांची संख्या
एप्रिल 9 लाख 21 हजार 820 पैकी 2 लाख 13 हजार 138 ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. मे 9 लाख 21 हजार 820 पैकी 2 लाख 37 हजार 590 ग्राहकांनी, जून 9 लाख 21 हजार 820 पैकी 2 लाख 14 हजार 937 ग्राहकांनी, जुलै 9 लाख 28 हजार 857 पैकी 2 लाख 28 हजार 10 ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. ऑगस्ट 9 लाख 32 हजार 933 पैकी 2 लाख 21 हजार 249 ग्राहकांनी, सप्टेंबर 9 लाख 35 हजार 290 पैकी 2 लाख 27 हजार 626 ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. ऑक्टोबर 9 लाख 40 हजार पैकी 1 लाख 80 हजार 68 ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. नोव्हेंबर 9 लाख 40 हजार पैकी 1 लाख 80 हजार 91 ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केले. एकूण 519 उच्च दाब ग्राहकांपैकी ऑक्टोबरमध्ये 18 तर नोव्हेंबर मध्ये 34 जननी ऑनलाईन पेमेंट केले. एकंदरीत 27 ते 28 टक्के ग्राहक या सुविधेचा फायदा घेत असून इतर ग्राहकांनी देखील ही सुविधा वापरावी म्हणून महावितरण विविध मार्गाने या सुविधेची माहिती करून देत आहे असे जनसंपर्क अधिकारी विश्‍वजित भोसले यांनी सांगितले.Λ