जळगाव । जळगाव जिल्ह्यातील सावदा, चाळीसगांव व भुसावळ या विभागातील वीज पुरवठा तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरीता शनिवार 17 जुन, 2017 रोजी तीन ते सहा तास बंद राहणार आहे. तरी सर्व सन्माननीय ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. कामे वेळेच्या आत पुर्ण झाल्यास विदयुत पुरवठा त्वरीत सुरु करण्यात येईल. कृपया संबंधित वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी. खालील प्रमाणे नमुद केलेल्या उपकेंद्र व फिडर (वीज वाहिनी) वरील वीज पुरवठा बंद राहणार आहे.
चारही विभागातील वीजपुरवठा बंद राहणार
सावदा विभाग – 33/11 केव्ही खिरोदा उपकेंद्रातून निघणार्या सर्व 11 केव्ही वाहिन्या (11 केव्ही खिरोदा गावठाण, रोझोदा गावठाण, चिंचाटी गावठाण, चिंचाटी शेती, रोझोदा शेती, सावखेडा शेती, सावखेडा सिंगल फेज, कळमोदा सिंगल फेज) आणि 33/11 केव्ही न्हावी उपकेंद्रातून निघणार्या सर्व 11 केव्ही वाहिन्या (11 केव्ही न्हावी-ख, न्हावी गावठाण, जे.टी.एम., खरड शेती, शेवडी शेती, धुळे शेती) सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत वीज पुरवठा बंद राहणार आहे. 132 केव्ही चाळीसगाव उपकेंद्रावरील – सीटीएम, हातले, सांगवी, नागद, वाघळी, कजगाव या सहा 33/11 केव्ही उपकेंद्र परिसरातील वीज पुरवठा सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत बंद राहणार आहे.