बारामती । राज्यभरातील वीजग्राहकांसाठी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत मोबाईल पला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. हे अॅप 27 लाखांहून अधिक ग्राहकांनी डाऊनलोड करून वापरण्यास सुरुवात केली आहे. वीजबिल भरण्यासह विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्याने वीजग्राहकांचा वेळ व श्रम वाचला असून, महावितरणच्या कार्यालयात लागणार्या रांगाही घटत असल्याचे दिसून येत आहे.
वीजग्राहकांना विविध सेवा ऑनलाईन, विशेषत: मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा संकल्प महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केला आणि दोन वर्षांपूर्वी ग्राहकांसाठी अद्ययावत मोबाईल अॅप आणून तो तडीस नेला. गेल्या दोन वर्षांत या मोबाईल अॅपला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल 27 लाख 65 हजार ग्राहकांनी ते डाऊनलोड करून वापण्यास सुरुवात केली आहे.
मराठी व इंग्रजी भाषेत अॅप
हे अॅप महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटसह मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर, विंडोज स्टोअर व पलच्या प स्टोअर या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अॅप वेळोवेळी अद्ययावत केले जात असून, ते मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. ग्राहकांना आपले वीजबिल भरण्यापासून सेवांविषयक तक्रारी नोंदवण्यापर्यंतच्या सर्व सुविधा या अॅपवरच उपलब्ध झाल्याने कार्यालयात जाण्याचे त्यांचे श्रम व वेळ वाचला आहे.
विविध सेवांचा अंतर्भाव
महावितरण मोबाईल पच्या नुकत्याच अद्ययावत केलेल्या आवृत्तीत वीजबिल पाहणे तसेच ते नेटबँकिंग, डेबिट,क्रेडिट,कॅश कार्ड, मोबाइॅल वॉलेट याद्वारे भरणे, खंडित वीजपुरवठा व अवाजवी बिलासह इतर वीजविषयक तक्रारी नोंदवणे, 24 तास सुरू असणार्या महावितरणच्या कॉल सेंटरशी संपर्क साधणे, ग्राहकाचा मोबाईल नंबर व ई-मेल नोंदवणे, मागील बिले तसेच ते भरल्याचा तपशील पाहणे, अंदाजे मासिक वीजवापर तपासणे, ग्राहकास कोणत्या वाहिनीवरून वीजपुरवठा होतो त्याची माहिती मिळवणे, एकापेक्षा अधिक कनेक्शन हाताळणे, नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे व अर्जाची स्थिती पाहणे, कनेक्शनसाठी शुल्क भरणे, सरासरी बिल टाळण्यासाठी मीटर रीडिंग पाठवणे, महावितरण सेवेविषयी अभिप्राय देणे, महावितरणचे नजीकचे कार्यालय अथवा बिल भरणा केंद्र शोधणे, वीजबिलांवरील ग्राहकाच्या नावात बदल करणे, वीजभार कमी वा जास्त करण्यासाठी अर्ज करणे, आपल्या परिसरातील संशयित वीजचोरीची तक्रार नोंदवणे इत्यादी सेवा उपलब्ध आहेत.सर्व वीज ग्राहकांनी आपले श्रम व वेळ वाचवण्यासाठी महावितरणच्या मोबाईल पचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाने केले आहे.