महावितरणच्या वाणिज्य संचालक पदावर सतीश चव्हाण यांची नियुक्ती

0

मुंबई । महावितरणच्या वाणिज्य संचालक या पदावर सतीश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. महावितरण मुख्यालयातील प्रकाशगड मुंबई येथील सांघिक कार्यालयात ते यापूर्वी कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. महावितरणमधील महत्त्वाच्या असलेल्या कार्यकारी वाणिज्य संचालक या पदावर दीड वर्ष काम केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन सतीश चव्हाण यांची संचालक वाणिज्य या महत्त्वाच्या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.

वाहिनीची जबाबदारी सांभाळली
मूळचे नांदेड येथील रहिवासी असलेले सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून 1987 मध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी सुमारे 14 वर्षे भारतासह दक्षिण कोरिया व बांगलादेशातील विविध स्टील उद्योगात महत्त्वपूर्ण पदावर काम केले आहे तसेच त्यांनी महापारेषण कंपनीतील 400 किव्हो व अतिउच्च दाब बांधकाम विभागात उपकेंद्र व वाहिनी उभारणीच्या कामाची जबाबदारी सुमारे 7 वर्षे सांभाळली आहे. 2009 साली त्यांची महावितरणमध्ये सरळसेवा भरतीने अधीक्षक अभियंता पदावर निवड झाली होती. या पदावर त्यांनी 5 वर्षे काम केले.