महावितरणच्या विरोधात काँग्रेस आणि बॅग मॅन्युफॅक्चरर वेल्फेअर असोसिएशनचा मोर्चा

0

कल्याण : काही दिवसांपूर्वी श्रीराम टॉकीज परिसरात पायी जाणाऱ्या नितीश शाहू या बॅग कामगाराचा विजवाहक मुख्यतार अंगावर पडून शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना घडली. या घटनेनंतर सदर वीज वाहक मुख्य तारांचे शॉर्टसर्किट होत असल्याचे तक्रार महावितरणला करूनही महावितरण ने दुर्लक्ष केल्याने शाहू यांच्या मृत्यूस महावीतरन जबाबदार असल्याचा आरोप बॅग मॅन्युफॅक्चरर वेल्फेअर असोसिएशन तथा कोंग्रेसचे पदाधिकरी शैलेश तिवारी यांनी करत संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई,मयताला नुकसान भरपाई,नागरिकांच्या तक्रारी चे 48 तासात निराकरण करणे अशा काही मागण्या केल्या होत्या मात्र या मागण्यांकडे महावितरण ने दुर्लक्ष केल्याने आज बॅग मॅन्युफॅक्चरर वेल्फेअर असोसिएशन व युवक काँग्रेसचे शैलेश तिवारी यांनी महावितरण कार्यलयावर मोर्चा काढत महावितरण च्या बेजबाबदार कारभाराचा निषेध व्यक्त केला .

कल्याण डोंबिवली सह आसपासच्या ग्रामीण भागात महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत . शहरात बर्‍याच ठिकाणी विज वितरण कंपनीच्या जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या पहावयास मिळतात. पावसाळ्या पूर्वी काही प्रमाणात विज वितरण कंपनी दर वर्षी डागडुजी करत असते. परंतू ज्या प्रमाणात डागडुजी व दुरूस्तीचे काम व्हायला हवे आहे ते होत नसल्याने विद्युत वाहक वाहीन्या व पोल पडून आपघात घडून नागरिक व जनावरांचा जिव गेल्याच्या घटना तालुक्यात घडल्यात व घडत असतात. परंतु या बाबीकडे विज वितरण कंपनीकडून कानाडोळा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

२७ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास श्रीराम टॉकीज जवळ विजवाहक मुख्यतार अंगावर पडून विजेचा धक्का लागल्याने नितीश शाहू या २२ वर्षीय बॅग कामगाराचा मृत्यू झाला. येथील मुख्यतारांचे शॉर्टसर्किट होत असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती मात्र महावितरणचे अधिकारी सदर दुरुस्ती करण्यासाठी आलेच नसल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप बॅग कामगारांनी केला आहे. संबंधीत विभागातील कार्यकारी अभियंता हे नितीश शाहू यांच्या मृत्यूस कारणीभूत असून त्यांच्या बेजवाबदारीमुळे ही घटना घडली असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मयताच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी तेजश्री या महावितरण च्या मुख्य कार्यालयावर बॅग कामगारांनी भव्य मोर्चा काढला. श्रीराम टॉकीज चौक खडगोळवली येथून सुरू झालेला हा मोर्चा विठ्ठलवाडी स्टेशन मार्गे आनंद दिघे उड्डाणपूल, वालधुनी ब्रिज, बाईचा पुतळा मार्गे कर्णिक रोड येथील महावितरणच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकला.या वेळी मोर्चेकर्यांनी जबाबदार अधिकार्याबर कारवाई ,मयताला नुकसान भरपाई,नागरिकांच्या तक्रारी चे 48 तासात निराकरण करणे अशा मागण्या करत निवेदन सादर केले.

दरम्यान महावितरणचे कार्यकारी अभियंता काळे यांनी याबाबत ४८ तासात सदर घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देणार असल्याचे आश्वासन मोर्चेकरयांना दिले.