जळगाव । महावितरणतर्फे प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त गुलाबराव सोनवणे, राजेंद्र महाजन या दोन कामगारांसह विनाअपघात सुरक्षित वाहन चालविण्याचे दिर्घसेवेबद्दल नंदकिशोर चोपडे, शरद माले, प्रकाश मालिच, रविंद्र भामरे या चार वाहनचालकांना मुख्य अभियंता बी.के.जनवीर यांचे हस्ते विशेष पारितोषिक व सन्मानपत्र देवून गुरूवारी प्रजास्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळामार्फत समाजामध्ये व स्वत:च्या आस्थापनेमध्ये जबाबदार घटक म्हणून बजाविलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देण्यात येतो. यातच महावितरण राज्य विद्युत मंडळ कर्मचारी कल्याण निधी समितीतर्फे प्रोत्साहनपर विशेष पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येते. सन 2014 चा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त गुलाबराव हिरामण सोनवणे हे वरिष्ठ यंत्रचालक पदावर शहादा विभागात व राजेंद्र हिम्मतराव महाजन हे सहाय्यक यंत्रचालक पदावर नंदुरबार विभागात कार्यरत असून त्यांचे गुरूवारी 2501 रुपयांचे धनादेश व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. तर महावितरणकडून दरवर्षी वाहतूक नियमांचे पालन करून विनाअपघात सुरक्षित वाहन चालविण्याचे दिर्घसेवेबद्दल वाहनचालकांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात येते. बक्षिस पात्र वाहनचालक नंदकिशोर मीठाराम चोपडे हे परिमंडळ कार्यालय जळगांव, शरद कौतिक माले हे मंडळ कार्यालय नंदुरबार,प्रकाश बाबूराव मालिच हे शहादा विभाग येथे कार्यरत असून त्यांची तीस वर्षाची दिर्घसेवा झाली असल्याने त्यांनाही दिर्घसेवेबद्दल धनादेश रू.7500/- सुपुर्द करून तर मंडळ कार्यालय धुळे येथे कार्यरत वाहनचालक रविंद्र रामदास भामरे यांना दहा वर्षाचे दिर्घसेवेबद्दल धनादेश रू.2500/- सुपुर्द करून सत्कार करण्यात येणार आहे.