महावितरणने कामबंदीचे आदेश मागे घ्यावेत

0
इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर्सचा आंदोलनाचा इशारा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर्स संघटनेच्या सभासदाला महावितरणमधून केलेल्या नियमबाह्य कामबंदी आदेश जारी केल्याच्या  निषेधार्थ संघटनेच्यावतीने महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन 26 डिसेंबर पासून महावितरण कंपनीचे रस्ता पेठेतील कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाणार आहे. संघेअ
भ्रष्टाचार उघड केल्याने कारवाई
काँट्रॅक्टर्स संघटनेच्या सभासदांनी सांगितले की, मुख्य अभियंता यांना कामबंदीचे आदेश मागे घ्यावे अशी मागणीचे निवेदन काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेप्रमाणे 1.3 % योजनेअंतर्गत ग्राहकांचे वैयक्तिक काम करणारे आमचे सभासद में. न्यू सिमरन इंटरप्रायझेस या संस्थेचे संचालक संतोष सौंदणकर यांना काम बंदी आदेश दिला होता. महावितरण पुणे यांच्या खत्यारीतील परिमंडलातील केंद्राच्या इन्फ्रा. योजनेतील झालेला भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून सौंदणकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. नियम बाह्य पद्धतीने जारी केलेले कामबंदी आदेशाचे पत्र पुनर्विचार करून काही दिवसात पुर्नबहाल करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अद्याप कामबंदीचे आदेश मागे घेतले नाही. त्यामुळे 26 डिसेंबरपासून महावितरण कंपनीचे रास्तापेठ कार्यालय / प्रकाश भवन आणि प्रकाशगड या ठिकाणी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.