महावितरण कर्मचार्‍यांचा सत्कार

0

अमळनेर। आपापल्या क्षेत्रात थकबाकीदार गावातून नागरिकांना विज बील भरण्याबाबत जनजागृती करून मार्च महिन्यात बहुतेक गावे थकबाकी शून्य केल्याबद्दल महावितरणचा अमळनेर उपविभागीय कार्यालयात विशेष कामगिरी केल्याबद्दल कर्मचार्‍यांचा विशेष कामगिरी प्रमाणपत्र सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात गावपातळीवर काम करून महावितरणला आर्थिक वर्षात मदतनीस म्हणून कार्य केल्याबद्दल अधिक्षक अभियंता संजय आकोडे यांचा हस्ते गौरविण्यात आले.
विज बील भरण्याबाबत जनजागृती करून बहुतेक गावे थकबाकी शून्य
महावितरणच्या अधिकार्‍यांकडून करण्यात आला सत्कार
महावितरणला आर्थिक वर्षात मदतनीस म्हणून कार्य केल्याबद्दल गौरव
विशेष कामगिरी केल्याबद्दल सत्कार
महावितरणच्या अमळनेर कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव विभाग विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता संजय आकोडे, प्रमुख पाहुणे म्हणून धरणगावचे कार्यकारी अभियंता विशाल कुलकर्णी, धरणगाव उपविभागीय अतिरिक्त कार्यकारि अभियंता दिलीप इंगळे, अमळनेरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय जोगी व उपकार्यकारी अभियंता मनोज पवार यांचे प्रमुख उपस्थित संचलन व सुव्यवस्था कार्यालय जळगावकडून आपापल्या क्षेत्रात विज देयकाची शुन्य करून विशेष कामगिरी केल्याबद्दल अधिकारी व कर्मचार्‍यांना विशेष कामगिरी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यात सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आलेले करखेड्याचे वरिष्ठ तंत्रदन्य प्रविन सुरेश पाटील, मालपुरचे शामकांत पाटील, सात्रीचे हरीश शेळके, मूडी दरेगावचे हरीश न्हावी व किशोर बिर्‍हाडे, यांचा वरील गावात वीज देयकाची थकबाकी शून्यकेल्याबद्दल अदिक्षक अभियंता संजय गायकवाड यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सत्कार प्रसंगी यांची उपस्थिती
कार्य क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याने अदिक्षक अभियंता यांनी रविंद्र मिस्तरी युसूफखा पठाण बाळू बाविस्कर योगेश पाटील कलमसरेचे ओमकुमार पाटील, बनसीलाल पवार, अरूण सोनवणे, पी.वाय.पाटील आदींचा विशेष कार्य केल्याबद्दल कार्यकारी अभियंता विशाल कुलकर्णी यांच्याहस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी कनिष्ठ अभियंता किशोर सुर्वे, जितेश बारी, रविंद्र नागदेवे, किशोर पाटील, आदित्य चिखले आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कळमसरेचे सतिष राजपूत, व्ही.एस. पाटील, डि.ए. बागूल, सुनील वाघ, राजू बडगुजर, अरूण सोनवणे आदिंनी परिश्रम घेतलेत.