रावेत : महावितरण समितीच्या सदस्यपदाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्यपूर्वक सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील. तसेच विद्युत वितरण विभागाला माझे सतत सहकार्य असेल, असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी केले. वाल्हेकरवाडी येथे आयोजित सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. चिंचवड विधानसभा मतदार संघातील विद्युत वितरण समिती नुकतीच गठीत करण्यात आली. या समितीच्या सदस्यपदी क्रीडा समितीचे उपसभापती तथा नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ आणि चिंचवड विधानसभा सदस्य भारती विनोदे यांची निवड झाल्याने वाल्हेकरवाडी येथील निसर्ग हौसिंग सोसायटी, बाळासाहेब ओव्हाळ मित्र परिवार आणि भाजपा किवळे मंडळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा प्रतिनिधी संतोष ढोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, शेखर चिंचवडे युथ फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर चिंचवडे, रोटरी क्लब वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, माजी नगरसेवक रघुनाथ वाघ, निता परदेशी, राजेंद्र चिंचवडे, पाटीलबुवा चिंचवडे, हेमंत ननवरे, विलास चव्हाण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बिभीषण चौधरी यांनी केले. सूत्र संचालन आदेश नवले यांनी केले. आभार विलास चव्हाण यांनी मानले.