शिरपूर । आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाला 25 वर्षे पूर्ण होत आहे. या अनुषंगाने रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्तान शनिवारी 9 रोजी माजी विद्यार्थी सभा व स्नेहमेळावा आयोजित करण्यात आले. गेल्या 25 वर्षात महाविद्यालयाने विद्यार्थी घडविले आहेत, त्यामध्ये काही फार्मसी उद्योग समूहांमध्ये उच्च स्थरावरती कार्यरत आहेत. महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले सध्या व्यवसायिक, उद्योजक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले 300 हुन अधिक माजी विद्यार्थी या सभेला उपस्थिती होती. दर वर्षी महाविद्यालयात माजी विद्यार्थी सभा हा उपक्रम राबविला जात असतो. पण रौप्यमहोत्सवी पर्वा निमित्ताने या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी माजी विद्यार्थी प्राचार्य डॉ. एस. जे.सुराणा, उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेडकर विभाग प्रमुख व इतर प्राध्यापक वृंद यांच्याशी संवाद साधला.
माजी विद्यार्थ्यांनी केले मार्गदर्शन
माजी विद्यार्थ्यांद्वारे महाविद्यालयात हल्ली डी.फार्मसी ते पी.एच.डी.चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांना मार्गदर्शन लाभले. फार्मसी क्षेत्रात अलीकडच्याकाळात होत असलेले बदल व विद्यार्थ्यांनी कोणती मूल्ये व गुणवत्ता आत्मसात करावयास पाहिजे या बाबींवर मार्गदर्शन लाभले. प्रा.डॉ.नितीन हसवानी, इन-चार्ज प्रा.डॉ.अनिल टाटिया, सेक्रेटरी प्रा.डॉ.प्रीतम जैन, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा.डॉ.एस.सी.खडसे यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेडकर यांनी माजी विद्यार्थी सभा यशस्वी आयोजनाबद्दल आभार प्रदर्शित केले.