महाविद्यालयातीन विद्यार्थी नऊ दिवसांपासून बेपत्ता

0

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – घरातून कॉलेजला जातो म्हणून निघालेला तरुण गेल्या नऊ दिवसापासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शुभम विरेंद्र शर्मा (वय 21, रा. रहाटणी) असे तरुणाचे नाव असून तो डॉ. डी.वाय पाटील महाविद्यालाचा विद्यार्थी असून तो घरातून कॉलेजला जातो म्हणून 20 जानेवारी रोजी घरातून निघाला तो आजपर्यंत घरी परतला नाही. याप्रकरणी शोध-शोध करूनही काही माहिती हाती लागली नाही. शुभम हा रंगाने गोरा असून उंची 5 फूट 7 इंच आहे. मध्यम बांधा, अंगावर डी.वाय.पाटील महाविद्यालयाचा गणवेश व निळ्या रंगाचा शर्ट, निळ्यरंगाची जिन्स, टाय, त्याला हिंदी व इंग्रजी बोलता येते. त्याच्याजवळ कॉलेजची सॅक व मोबाईल आहे. याप्रकरणी शुभमचे मामा पंकज बादल यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वरील वर्णनाचा तरुण आढळल्यास त्वरीत वाकड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.