खिर्डी : सरकार ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या विचारात असून महाविद्यालयीन ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाहीय कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. अजूनही अनेक भागात व्यवस्थित रेंज येत नाही व सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतात असं नाहीय, साधा निकाल बघायचं म्हटलं तर संकेतस्थळ हँग होते आणि त्यात परीक्षा ऑनलाईन म्हटल्यावर तर खूपचं कठीण आहे. बरेच विद्यार्थी हॉस्टेलला राहतात आणि आता ते घरी गेल्यामुळे त्यांचे नोट्स, पुस्तक हॉस्टेलला असल्यामुळे त्यांना न अभ्यास करता ऑनलाईन परीक्षा देणे शक्य नाही यामुळे ऑनलाईन परीक्षा अंतिम उपाय नसावा वा महाविद्यालयीन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी युवा सेना विभाग प्रमुख तुषार कचरे यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
झालेच तर परीक्षा पॅटर्न पण बदलेल का…?
विद्यार्थी खूप मोठ्या संभ्रमावस्थेत आहे. या वर्षीची कोणतीही परीक्षा न घेता फक्त शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना होम असायमेन्ट द्यावे व त्यानुसार त्यांना मार्क्स देऊन पदवी द्यावी किंवा मागील गुणांची सरासरी काढून मार्क्स द्यावेत. जेणेकरून पुढील शैक्षणिक वर्षाचा ताळमेळ बिघडणार नाही. पदवी परीक्षा उशीराने घेतल्या तर पुढच्या सत्रात वर ताण येऊन सर्व वेळपत्रक विस्कळीत होईल त्यामुळे यावेळी परीक्षा न घेण्याचा विचार केला तर तो परीस्थितीला साजेसा असणार आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची हीच अपेक्षा
महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी वर्गाची या प्रकारची मागणी आहे. कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र राज्यातील परीस्थिती खूप चिंताजनक व गंभीर आहे आणि अशी परिस्थिती असताना महाविद्यालयीन परीक्षा घेण्याचा निर्णय जर झाला तर परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या होणार्या गर्दीमुळे सोशल डिस्टसिंग चे पण तीन तेरा वाजतील , उद्याच्या भारताचे भविष्य असणार्या विद्यार्थ्यांचे हित म्हणजेच देशहित आहे. आपण विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेता होणार्या परिक्षांबाबत निर्णय घेताना विद्यार्थ्यांना येणार्या अडचणींचा विचार व्हावा व परीरक्षेबाबत सर्वच प्रकारच्या स्पष्टता येणे ही विनंती. विद्यार्थ्यासाठी सकारात्मत दृष्टीकोन ठेऊन आपण निर्णय घ्याल, अशी अपेक्षाअसून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेना उपतालुका प्रमुख रावेर तथा युवासेना विभाग प्रमुख रावेर तुषार प्रकाश कचरे (ऐनपूर) यांनी उदयजी सामंत (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.