महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

0

मुंबई- राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महावीर जयंती भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, विश्वशांती व अनेकांताच्या संदेशाचे स्मरण देते.

मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषत: जैन बंधु-भगिनींना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.