जळगाव : महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. 599 अथवा इ.स.पू. 615 सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला. या पाश्वभुमीवर शहरात दरवर्षा प्रमाणे मोठ्या उत्साहान महावीर जयंती साजरी केली जाते. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलसेल असते. सकाळी 7 वाजुन 30 मिनीटानी ध्वज वंदना करुन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.तर कार्यक्रमाचे उद्घाटन व दिपप्रज्वल माजी मंत्री सुरेश जैन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवरामध्ये उदयोजक रतनलाल बाफना, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, दलु जैन, रमेश जैन, तेरा पंथीचे मनोज सुराणा, आदी उपस्थित राहणार आहेत.
अशा प्रकारे कार्यक्रम
सकाळी 7 वाजुन 30 मिनीटांनी ध्वजवंदन, 8 वाजेला शोभा यात्रा टॉवर चौकापासून ते सुभाष चौकमार्गे बांलगंधर्व येथे समारोप होणार आहे. तसेच 9 वाजुन 30 मिनिटाला महावीर भगवान यांच्या जीवन चरित्राविषयी मानसी जेम, अंकलेश्वर यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे. प्रमुख मान्यावरांच्या हस्ते देहदान करणार्यांच्रा कुटुंबांतील व्यक्तीचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच बालगंधर्व सभागृहात विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच गौतम प्रसादी कार्यक्रमाचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी केली आहे. कार्यक्रमासाठी कमेटी सदस्य प्रितेश चोरडीया, प्रवीण छाजेड, रितेश गांधी, महेंद्र जैन, प्रवीण पगारीया, संजय रेदासनी, विशाल चोरडीया आदी परिश्रम घेणार आहेत.