जळगाव : दुधफेडरेशन जवळील महावीर नगरात घराच्या अंगणात लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी दुचाकी मालक जयेश गोभीलाल लाठी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावीन नगरातील जयेश गोभीलाल लाठी यांचे शहरातील जोशीपेठ येथे सोनारी कामाचे दुकान आहे. 28 डिसेंबर 2016 रोजी जयेश लाठी हे सकाळी दुकानावर निघून गेले. काम आटोपून रात्री 10.30 वाजेच्या सुमारास दुचाकी क्रं. एमएच.19.बीडी.7868 वरून घरी येवून अंगणात दुचाकी उभी केली. यानंतर सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास बाहेर फिरण्यासाठी लाठी हे घराबाहेर निघाले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना दुचाकीबाबत विचारपूस केली असता त्यांना देखील दुचाकीविषयी माहिती नव्हती. अखेर परिसरात शोधून घेवून देखील दुचाकी मिळून न आल्याने चोरी झाल्याची खात्री त्यांना पटली. यानंतर आज रविवारी जयेश गोभीलाल लाठी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.