जळगाव । महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शहरातील दूध फेडरेशन भागात तीन बहरलेल्या मोठया झाडांची तोड करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रार केल्यानंतरही मनपाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वीजेच्या तारांना अडथळा ठरणार्या झाडांच्या फाद्या काही भागात तोडल्या जात आहेत.
मात्र दूध फेडरेशननजीकच्या महावीर नगरात 5 रोजी काही व्यक्तींनी अचानक येऊन झाडे तोडण्यास सुरूवात केली. यात दोन लिंबाची झाडे व अन्य एक झाड तोडण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला असता या व्यक्तींनी कोणतीही दखल घेतली नाही. झाड तोडण्यापूर्वी महापालिकेची परवानगी आवश्यक असते, मात्र या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आले आहे.