महावीर स्कूलचे राज्यस्तरीय परीक्षेत यश!

0

पहूर । येथील गोदावरी फाऊंडेशन संचालित महावीर पब्लीक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय अ‍ॅबॅकस परीक्षेत यश मिळवून पहूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅबॅकस परीक्षेत दिपाली साईदास चव्हाण ही चिमुकली रेनबो लेव्हलमध्ये राज्यातून पहिली आली तर दिव्या योगेंद्र वानखेडे हीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

वैभव पाटील, मनोज कुमावत, मोहीत घोलप यांनी उत्तेजनार्थ बक्षीसे पटकवीली. त्यांना मुख्याध्यापिका एस.आर. कुळकर्णी, आर.एच.चव्हाण, कविता लाड, दीपाली नेमाडे, मिनाक्षी महाजन अनिता कंडारे, आसिफ पिंजारी आदींचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप लोढा, पंकज लोढा, सचिन पाटील, श्यामराव सावळे, विपीन लोढा, विनोद लोढा आदींनी सत्कार केला.