महाशिवआघाडीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा !

0

मुंबई: शनिवारी २३ रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला समर्थन दिल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे प्रकरण संपूर्ण देशासाठी धक्कादायक होते. मात्र अजित पवारांचा हा निर्णय पक्षविरोधी असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना समर्थन नसल्याचे सांगितले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र असून भाजपला सभागृहात बहुमत सिद्ध करता येणार नाही असा दावा केला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत भाजपला बहुमत सिद्ध करण्याची मुदत आहे. त्यापूर्वी हे सरकार बहुमत सिद्ध करणार नसल्याचे गृहीत धरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आज सकाळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. आज सकाळी १०.२० वाजता राज्यपालांच्या कार्यालयाला पत्र देण्यात आले आहे.