जळगाव । महाशिवरात्री निमित्त आध्यात्मिक संदेश व्हाटसअॅपच्या माध्यमातून देऊन त्याचा विश्वविक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ओमशांती मीडिया, बीकेवार्ता वेबपोर्टल आणि डॉ. दिपक हरके यांनी करण्याचे निश्चित केले आहे. याची नोंद लंडन येथील वंडर बुक ऑफ रेकार्ड इंटरनॅशनल येथे होणार असल्याचे उपक्रमाचे माध्यम संयोजक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगीतले.
28 फेब्रुवारीच्या रात्रीपासून पाठविणार संदेश
ब्रह्माकुमारीज्चे डॉ. दिपक हरके आणि ब्रह्माकुमारीज् ओमशांती मीडियाचे संपादक बी.के. गंगाधर यांच्या मदतीने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा प्रमुख उद्देश म्हणजे महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य व्हाटसअॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविणे असा आहे. 22 ते 28 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत 7 दिवसात 7 कोटी व्हाटसअॅप युजर्सला महाशिवरात्रीचा आध्यात्मिक संदेश प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी ओमशांती मीडिया पत्रिका, बीकेवार्ता वेबपोर्टल यांचे विशेष सहकार्य असणार आहे. या जागतिक विक्रमाचे उद्घाटन भारतीय क्रीकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या हस्ते मुंबई येथील बीकेसी मधील एमसीए क्लबमध्ये झाले. या उपक्रमाबद्दल राहणे यांनी विश्वविक्रमाचे आयोजक डॉ. दीपक हरके यांचे कौतुक केले व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय जगभर करीत असलेल्या काार्याची प्रशंसा केली. हा संदेश जीवनात प्रत्येकाने अंगीकारावा असे आवाहन केले.