महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम उत्साहात

0

भुसावळ । येथील राजगौंड समाजातर्फे हनुमान मंदिरात आदिवासी संस्कृतीनुसार महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात आला. समाजाचे पुजारी योगेश्‍वर महाराज यांच्या हस्ते सकाळी महादेवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच रात्रभर जयसेवा व माता काली कंकाली गटातर्फे तसेच पुरुष मंडळींसोबत जागरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी धार्मिक भजने गायन्यात आली. दुसर्‍या दिवशी पहाटे 6 वाजता पुजेची समाप्ती, आदिवासी गोंडी भाषेची भजने, आरती व देवाचे नामस्मरण तसेच प्रसाद वाटपाने करण्यात आली.

अभिषेक व फराळ वाटप
श्रीराम मंदिराजवळील पुरातन महादेव मंदिरात पहाटे 4 वाजेच्या सुमारास पंडीत प्रशांत भोंडे गुरुजींच्या हस्ते महादेवाच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. यानंतर महाआरती झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जे.बी. कोटेचा, नगरसेवक दिनेश राठी, देवेंद्र वाणी, शिरीष नाहाटा, ब्रिजलाल लाहोटी, प्रशांत वैष्णव यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले तर रविंद्र पुरोहित व त्यांच्या सहकारी मंडळातर्फे संगीतमय हनुमान चालिसा, ग्रंथाचे वाचन व भक्तिगीते गायली गेली. याप्रसंगी राजू गुरव, पवन दरगड, मयुर शर्मा, ताराचंद शर्मा, नितीन जोशी, नितीन गुरव, मनोज नगरे, अशोक धांंडे, चिंटू झवर, नट्टू झवर, शाम इखनकर, राधेश्याम लाहोटी, हरी तिवारी, हरी अग्रवाल, पप्पू इखनकर, रमेश इखनकर, सुभाष भावसार, विजय काबरा, संतोष टाक, रमणलाल वर्मा आदी उपस्थित होेते.

कुर्‍हाकाकोडा येथे महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटप
मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा येथे विविध ठिकाणी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील धुपेश्‍वर तिर्थक्षेत्र येथून जवळच आहे. महाशिवरात्रीला संपूर्ण परिसरातून भाविकांची अलोट गर्दी कुर्‍हा येथूनच धुपेश्‍वरला जात असते. त्यामुळे येथील विविध संघटना, संस्था, तरुण मित्रमंडळांनी भाविकांना फराळ वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविला.

श्रीसंप्रदायातर्फे फराळ वाटप
येथील श्रीसंप्रदायाच्या भक्तगणांच्या वतीने क्रांतीनगरमध्ये भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी काकोडा येथून पायी दिंडी सोहळा धुपेश्‍वरला जात असतांना क्रांती नगरात या पालखीची पुजा डॉ. गजानन खिरळकर यांच्या हस्ते करण्यात आली. दिंडीतील 500 भाविकांना फराळ वाटप तसेच रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांना सुध्दा फराळ वाटप करण्यात आले. यावेळी नंदू खिरळकर, प्रभाकर बडुगे, काशिनाथ खिरळकर, नितीन खिरळकर, सोपान खिरळकर, संजू खिरळकर, पंकज खिरळकर, गणेश ढोले, रमेश खिरळकर, बबलू जैस्वाल आदी उपस्थित होते.