महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले मुक्ताई, चांगदेव महाराजांचे दर्शन

महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच मुक्ताई व चांगदेव येथे संत मुक्ताई व चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी

मुक्ताईनगर : महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच मंगळवारी भाविकांनी मुक्ताई व चांगदेव येथे चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी उासळली. सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ-मोठ्या रांगा लागल्या. पहाटेपासून छोट्या-मोठ्या दिंड्यांचे आगमन सुरू होते. अनेक दिंड्यांनी दर्शन घेऊन परतीचा मार्ग धरला तर काही दिंड्या मुक्कामाला थांबल्या आहे. चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी उसळली. मुक्ताईच्या दर्शनानंतर तसेच महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यातून भाविक मोठ्या संख्येने खाजगी वाहनांद्वारे तसेच पायी दिंडी रुपाने येत होती.

अधिकारी तळ ठोकून
चांगदेव यात्रेत पोलिसांचे सहकार्य चांगल्या प्रकारे लाभले असून त्यांनी दिवसभर भाविकांना सेवा पुरवली आहे तसेच ट्राफिक जाम झाले असताना ट्रॅफिक सुरळीत करण्यास मदत केली
ग्रामपंचायतीमार्फत नागरीकांना सुविधा पुरविण्यात येतात तसेच काही सहकार्य लागले असते. या ठिकाणी कार्यालय उघडण्यात आले होते. सरपंच निखील बोदडे, उपसरपंच दत्तू चौधरी व ग्रामविकास अधिकारी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी दिवसभर यात्रेत तळ ठोकून होते.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
चांगदेव यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे शिंगाड्याचा दराबा होय. यावेळी भाविकांनी नौकाविहाराचा आनंदही घेतला. प्रसंगी पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, हवालदार गणेश मनुरे व पोलिसांनी बंदोबस्त राखला. कोथळी येथील मुक्ताई मंदिरात व चांगदेव महाराजांना अभिषेक आमदार चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक केला तर चांगदेव येथे सरपंच निखील बोदडे यांनी सपत्नीक, पोलीस पाटील पल्लवी चौधरी भूषण चौधरी यांच्याहस्ते अभिषेक करण्यात आला.

गुरु-शिष्याची झाली भेट
मुक्ताई दिंडी चांगदेव महाराजांच्या भेटीसाठी आल्याने टाळ मृदुंगाच्या गजरात मुक्ताई दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, हभप रवींद्र हरणे महाराज, हभप उद्धव जुनारे महाराज, ज्ञानेश्वर हरणे यांच्यासह वारकरी भाविक उपस्थित होते.