नवापूर । नवापूर एस.टी आगार विभागातर्फे महाशिवराञी निमित्त जादा बस गाडयांचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी 12 वाजता नवापुर, विसरवाडी, खांडबारा, धानोरा या मार्गाने एसटी बसेस देवमोगरा येथे जाणार आहे. जास्त प्रवाशी असल्यास थेट देवमोगरा बस देण्यात येणार आहे अशी माहीती देवमोगरा केंद्रप्रमुख विश्वास गावीत यांनी दिली.
नंदुरबार जिल्हातील आराध्य देवत देवमोगरा माता आहे. याञा 21 फेब्रवारी पासुन सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून असंख्य भाविक यात्रेसाठी जात असतात. यासाठी नवापूर आगार विभागातर्फे जादा एस टी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ही यात्रा 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार
आहे.