भामेर । निजामपूर येथील म्हसाई माता महिला सहकारी पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मीकांत विरेंद्रलाल शाह व पतसंस्थेच्या संचलीका योगीता लक्ष्मीकांत शाह यांनी धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. या दोघांनी लेखी पत्राद्वारे जिल्हा पतसंस्था महासंघाच्या चेअरमन यांचा राजीनामा सादर केला.
राजीनाम्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा
म्हसाई माता महिला पतसंस्थेच्या संस्थापक व स्वामी विवेकानंद पतसंस्था निजामपूर संचालक लक्ष्मीकांत शाह व म्हसाई माता महिला पतसंस्थेच्या संचलीका योगीता शाह यांनी धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक पदाचा राजीनामा पतसंस्था महासंघाच्या चेअरमनकडे लेखी पत्रातून पाठविला आहे. काही अपरिहार्य कारणास्तव आम्ही दोघांनी पतसंस्था महासंघाच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी राजीनामा पत्रातून नमुद केले आहे. धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाच्या निवडणूकीत लक्ष्मीकांत शाह हे बिनविरोध निवडून आले होते. तर योगिता शाह ह्या चुरशीच्या निवडणूकीत विजयी झाल्या होत्या. पतसंस्था महासंघाचे चेअरमन यांच्याकडे राजीनामा पाठविला असून शाह पती, पत्नी यांचा संचलाक पदाचा राजीनामा स्विकारला असला तरी तो मंजूर होतो की शाह दांपत्यांची समजूत काढून राजीनामा मागे घेण्यास सांगितले जाते याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.