महासत्ता देशांच्या बरोबरीत भारताचे स्थान

0

भुसावळ । पुर्वी भारतास साप, गारुडी तसेच साधुंचा देश म्हटले जायचे परंतु आज देशाने इतकी प्रगती केली आहे की महासत्ता असलेल्या देशांच्या पंक्तित जाऊन बसला आहे. प्रसंगी आपला देश शत्रुशी मुकाबला करण्यास समर्थ असल्याचे प्रतिपादन अनुसुचित ठाकुर जमा मंडळाचे सुनिल ठाकुर यांनी केले. येथील सार्वजनिक वाचनालयात क्रांतीदिनी क्रांतीवीर बिरसामुंडा आणि ग्रंथालय शास्त्राचे जनक शि.रा. रंगनाथन यांची जयंती अनुसुचित ठाकुर जमात मंडळ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे संयुक्तरित्या साजरी करण्यात आली.

बिरसा मुंडा यांचे कार्य प्रेरणादायी
सुरुवातीस सार्वजनिक वाचनालयाचे तसेच मंडळाचे तालुकाध्यक्ष हिंमत ठाकुर यांनी दिपप्रज्वलन करुन प्रतिमेस माल्यार्पण केले. मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. आदिवासींच्या उन्नतीसाठी तसेच इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी क्रांतीवीर बिरसामुंडा यांनी इंग्रजांविरुध्द बंड पुकारुन आंदोलन केले. ते आयुष्यभर या जुलमी राजवटीविरुध्द लढत राहीले, असे सुनिल ठाकुर यांनी यावेळी सांगितले. वाचनालयात ग्रंथसंख्या वाढवून ग्रंथाची नीट मांडणी कशी करावी. पुस्तकांचे जतन कसे करावे. या बद्दलचे शास्त्र शि.रा. रंगनाथन यांनी ग्रंथालयास दिले. त्यांनी ग्रंथमित्र वाचकवर्ग यांचे ताळमेळ जमण्यासाठी प्रयत्न केले, असेही सुनिल ठाकुर आपल्या भाषणात संबोधन केले. यशस्वीतेसाठी ग्रंथपाल नितिन तोडकर, सहग्रंथपाल राजेंद्र मराठे, लिपीक अवधुत दामोदरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी नगरसेवक दुर्गेश ठाकुर, जिल्हा उपाध्यक्ष बाळु ठाकुर, मंडळाचे पदाधिकारी तसेच सभासद, वाचकवर्ग उपस्थित होते.