महा ई सेवा केंद्रामार्फत कॅशलेस व्यवहाराबद्दल मार्गदर्शन

0

नवापूर : शहरातील विविध शाळांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने महा ई सेवा केंद्रामार्फत कॅशलेस व्यवहाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील शिवाजी हायस्कूल, सार्वजनिक गुजराथी व मराठी हायस्कूल येथे जाऊन सी एस सी चे जिल्हा समन्वयक सचिन पाटील व हिमांशू पाटील यांनी रोखरहित प्रणाली बाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. नोटा शिवाय व्यवहार अगदी सोपा कसा आहे, हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच कॅशलेस व्यवहाराबाबत असलेले प्रश्न विद्यार्थानी विचारले त्यास उत्तर देऊन समाधान करण्यात आले. केंद्र शासनाने हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्राचार्य आर व्ही पाटील, उपमुख्याध्यापक अनिल पाटील पर्यवेक्षक प्रविण पाटील बी आर पाटील, प्राचार्य संजीव पाटील, गणेश लोहार, प्रा कमल शहा, कामिनी राणा, गीता पाटील मिलिंद वाघ, जगदीश तांबोळी,शरद नेरे, रितेश तांबोळी आदी उपस्थित होते या कार्यक्रमात आभार शरद नेरे यांनी मानले

अशी आहेत कॅशलेसची साधने-
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅकिंग, मोबाइल वाॅलेट, युपीआय वाॅलेट, मोबाइल बॅकिंग व युएसएसडी,पीओएस (पाॅईट आॅफ सेल) आधार कार्ड आदि कॅशलेस व्यवहाराची साधने आहेत. त्यामुळे नागरिकांनी या साधनाचा वापर करून कॅशलेस व्यवहारावर भर द्यावा नोटा शिवाय हा व्यवहार अगदी सोपा आहे देशोन्नतीचा हा दुवा आहे रोखरहित प्रणाली शिका व इतरांनाही शिकवा असे आवाहन सचिन पाटील यांनी केले.