धुळे । फर्स्ट चॉईस ही महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांची सिस्टर कंपनी असून देशात 2008 पासून विविध कंपन्यांमध्ये सेवा दिल्यानंतर 2014 पासून देशात 408 ठिकाणी सर्व्हिस सेंटर सुरू केले आहेत. आता धुळ्यातही सर्व्हिस सेंटर सुरू झाल्याने ग्राहकांना सेवा उपलब्ध झाली आहे. धुळ्यात सुरत बायपास रोडवर अधिकृत सर्व्हिस सेंटर स्वामी ऑटो सर्व्हिसेस या कंपनीच्या भव्य अशा दालनाची सुरुवात करण्यात आली आहे. स्वामी ऑटो सर्व्हिसेस सेंटरला चांगल्या प्रकारे कारधारकांनी प्रतिसाद दिला आहे. नाशिक, मुंबई, पुणे येथे मिळणार्या विविध सुविधा येथे उपलब्ध आहेत.
सर्व कंपनीच्या कार्यची दुरूस्ती
देशात 200 शहरात 240 ठिकाणी यशस्वीरित्या कारला दर्जेदार सेवा देण्याचे काम फर्स्ट चॉईस करीत आहे. कारची वॉरंटी काळ संपल्यानंतर कारला सर्व्हिसींग देणारी ही कंपनी आहे. येथे सर्व कंपनीच्या कार्सची एकाच छताखाली प्रशिक्षित, कुशल व अनुभवी कारागीर तथा आधुनिक मशीनरीद्वारे अचूक निदान करून कारच्या दुरूस्तीचे काम केले जाते.ओरीजनल स्पेअर्स पार्ट, प्रशिक्षित, कुशल व अनुभवी कारागीर, आधुनिक पध्दतीच्या मशीनरीद्वारे अलायमेंट आणि बॅलेंसींग, कार ए.सी. गॅस रिफिलींग, नायट्रोजन हवा, डेटिंग व पेंटीग, आधुनिक पध्दतीने कार वॉश केली जाते. कारला आतून बाहेरून संरक्षण कवचासाठी दर्जेदार र्जमन कंपनीचे कोटींग उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना त्यांच्या घरी जाऊन कार पीकअप करण्याची सोय देखील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी एकदा या सर्व्हिसेसला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संचालक ईश्वर मोरे यांनी केले आहे.