जळगाव। शहरातील वाढते गुन्हे आणि आगामी रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी 6 वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी प्रभारी अधिकार्यांची बैठक घेतली. यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे या विषयी त्यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या. बैठकीला पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, आत्माराम प्रधान, प्रदीप ठाकूर, सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, अरविंद भोळे उपस्थित होते.
बैठकीत गेल्या काही महिन्यातील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. गुन्हेगार दत्तक योजनेत पोलिस ठाण्यांच्या कर्मचार्यांकडे हद्दीतील गुन्हेगार देण्यात आलेले आहेत. या सर्व हिस्ट्रीशीटरची माहिती घेऊन अधिकारी आलेले होते. त्यात अनेक गुन्हेगारांनी रहिवास असलेल्या पोलिस ठाण्याच्या व्यतिरीक्त दुसर्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतही गुन्हे केलेले आहेत. त्यांची माहिती प्रभारी अधिकार्यांना देण्यात आली.