महिनाभरात जिल्ह्यातील घरकुलांची कामे पूर्ण करा

0

जळगाव । शासनाच्या फ्लॅगशीप मधील महत्वाकांक्षी उपक्रम घरकुल बांधकामाचा आहे. जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले आहे. 31 जुलै पर्यत उद्दिष्ट पुर्ण करण्याचे आदेश आहे. उद्दिष्ट पुर्ततेसाठी महिन्याभराचा अवधी शिल्लक असून महिन्याभरात सर्व घरकुलाचे कामे पुर्ण झाली पाहिजे अशी तंबी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त मित्रगोत्री यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, अभियंता यांना दिली.

जिल्ह्यातील घरकुलाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी राज्यप्रकल्प संचालक शेंडगे, जिल्हा परिषद सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, अतिरीक्त सीईओ संजय म्हस्कर, प्रकल्प संचालक विक्रात बगाडे उपस्थित होते. जिल्ह्यातील घरकुल योजनेचा काम प्रगतीपथावर असून जवळपास 60 टक्के कामे पुर्ण झाली आहे. 40 टक्के काम शिल्लक असून ही कामे वेळेत पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.