येरवडा : वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम विश्रांतवाडी वाहतूक पोलिसांनी हाती घेतली असून यामध्ये महिनाभरात दोन हजारांहून अधिक वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी दिली.
विश्रांतवाडी चौक येथून शिवाजीनगर, येरवडा, लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ व श्री क्षेत्र आळंदीकडे मार्ग जात असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या भागातील मुख्य वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन लगतच वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून या विभागाचा होळकर पूल, धानोरी, कळस व आळंदी पुलापर्यंत हद्द नेमण्यात आली आहे.