मुंबई । राज्यात 7/12 संगणकीकरणाचे काम सुरू असून, येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मोबाइलवरच 7/12 पाहता येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत दिली. दहिसर येथील 14 एकर भूखंड महसूल अधिकार्यांच्या संगनमताने खासगी व्यक्तीमार्फत हडपण्यात आल्याची लक्षवेधी सचना शिवसेनेचे अनिल परब यांनी विधानपरिषदेत मांडली होती. मुंबई उपनगरात कूळ लावण्याचे मोठे रॅकेट सुरू असल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.
त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी ही माहिती दिली.7/12 मोबाइलवर पाहता येणार असल्याने अनेक गैरप्रकारही टाळता येणार आहे. संबंधित जागेविषयी बोलताना ते म्हणाले की, ब्रिटिशांनी अनेकांना खोती दिल्या होत्या त्या खोती रद्द करून ताब्यात घेतली आहेत. त्यात कोर्टानेही निर्णय दिला आहे. यासंदर्भात सभापतींच्या दालनात बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात येईल असेही मंत्र्यांनी सांगितले.