महिनाभरापूर्वीच विवाहबध्द झालेल्या  मुलगी-जावयाची भेट ठरली अखेरची

0

थोरगव्हाणहून परततांना डांभुर्णी जवळ कार उलटल्याने मनपातील वाहन चालक पित्याचा मृत्यू 

28 डिसेंबरलाच झाले होते मुलीचे लग्न 

दैव बलवत्तर अपघातात 10 वर्षाचा मुलगा वाचला

जळगाव : दोन महिन्यांपूर्वीच घरासमोर थाटात दुसर्‍या क्रमांकाच्या मुलगी निखिताचा थोरगव्हाण येथील अतुल चौधरी यांच्याशी थाटात पार पडला. महिना उलटण्यात आला म्हणून जावई, पोरीची खबरबात घ्यावी म्हणून रविवारी तिला भेटण्याचे नियोजन केले अन् मित्राची कार घेवून थोरगव्हाणला जावून भेटही घेतली. मात्र जळगावकडे पतरताना काळाने अपघाताच्या रुपात झडप घातली. अन् यात मनपाचे वाहन चालक राजेंद्र रामदास चव्हाण वय 55 रा. रामेश्‍वर कॉलनी या पित्याचा दुर्देवी मृत्यू झाला. पित्याने जावई व मुलीची घेतलेली भेट अखेरची ठरली. मुलीच्या लग्नाचा महिनाभरही आनंद पुरला नाही तोच पाटील कुटुंबियांत शोककळा परसरली आहे.

रामेश्‍वर कॉलनी येथील महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील वाहन चालक राजेंद्र रामदास पाटील वय 55 रा. रामेश्‍वर कॉलनी हे पत्नी प्रतिभा, मुलगा तेजस व मुलगी रविना या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्याची मोठी मुलगी माधुरी हिचे लग्न झाले असून मितावली नांदत आहेत. तर दुसर्‍या क्रमांकाची मुलगी निखिता हिचा थोरगव्हाण येथे नांदत आहेत. थोरगव्हाण येथील व्याही ईश्‍वर जयसिंग चौधरी यांच्याकडे कौटुंबिक कार्यक्रम असल्याने तसेच त्यानिमित्ताने येथील मुलगी निखिता व जावई यांची भेट होईल म्हणून रविवारी राजेंद्र पाटील हे मित्र अंकुश निकम याची कार (क्र एम.एच.19 बी.जे. 5509) घेवून गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा तेजस वय 10, व कॉलनीतील विक्की उर्फ रजणीत मनोज टाक व भूषण रमेश चौधरी हे गेले होते.

कारच्या तीन पलट्या, दैव बलवत्तर मुलगा वाचला
निखिता व जावयाची भेट घेतली रात्री जळगावकडे परतले. यादरम्यान डांभुर्णी गावाजवळ नागमोडी वळणावर समोरुन येणार्‍या ट्रकच्या लाईटच्या प्रकाश डोळ्यावर चमकल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने कार पलटी झाली. यात रस्त्याखाली उतरून कारने तीन वेळा पलटी मारली. यात चालक राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. चालक राजेंद्र यांच्याजवळ च समोर कारमध्ये त्यांचा मुलगा तेजस बसला होता. त्याला मुक्का मार बसला.सोबतच्या विक्की व भूषण यांनाही दुखापत झाली आहे. जिल्हा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच राजेंद्र पाटील यांची प्राणज्योत मालवली होती. तीन पलटी मारल्यावरही दैव बलवत्तर म्हणून तेजसला काहीच झाले नाही. मात्र डोळ्यासमोर पित्याचा मृत्यू झाल्याने त्याचा आक्रोश मन हेलावणारा होता.

28 डिसेंबरला लग्न अन् 28 जानेवारीला पित्याची अंत्ययात्रा
राजेंद्र पाटील यांच्या मुलीचे 28 डिसेंबर रोजी थोरगव्हाण, ता.यावल येथील तरुणाशी झाले होते. जावई अतुल चौधरी हे पुणे येथे औषधीची मार्केटींग म्हणून नोकरी करतात. 28 डिसेंबर रोजी त्या घरासमोर थाटात विवाह झाला. महिना पूर्ण होत नाही तोच 28 जानेवारी रोजी पिता राजेंद्र पाटील यांच्या अंत्ययात्रेने रामेश्‍वर कॉलनी परिसर सुन्न झाला होता. पत्नी, मुलगा, तीनही मुलींसह दोन्ही जावई अतुल चौधरी व रविंद्र पाटील यांनाही शोक अनावर झाला होता. सोमवारी सकाळी 8 वाजता पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. सोमवारी सकाळी त्याच्यावर नेरीनाका येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेंद्र पाटील यांना सात भाऊ असून राजेंद्र ते सर्वात लहान होते. सर्व भाऊ शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होते. मनमिळावू व प्रत्येकाच्या सुखःदुखःत सहभागी होणारे पाटील यांच्या रामेश्‍वर कॉलनीच्या मनपा पाणी पुरवठा कार्यालयातील सहक ार्‍यांनाही अश्रू अनावर झाले होते.