जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे मोफत शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप मंगळवारी करण्यात आला. गेल्या महिन्याभरात या अभियानात 537 रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्ह्यातील गरजू रूग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे 1 जानेवारी ते 31 जानेवारी मोफत शस्त्रक्रिया अभियान राबवित आले. या अभियानात 5734 रूग्णांनी तपासणी करण्यात आली तर यातील 537 गरजू रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली तसेच उर्वरीत रूग्णांना उपचारविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या आजारांवर शस्त्रक्रीया
अभियानात मुत्राशयाचे आजार, कॅन्सरचे आजार ,पोटाचे विकार, लहान मुलांवरील शस्त्रक्रिया, हर्निया अपेंन्डीक्स,मूतखडा, किडनी स्टोन, प्रोस्टट, प्लास्टीक सर्जरी,हायड्रोसिल,पित्ताशयातील खडे, पानथरी, मुत्रपिंडातील खडे, भगेेंद्र, स्तनांचे कॅन्सर, छोट्या गाठी, स्तनांच्या गाठी साध्या, मुत्रनलिकेतील खडे, अल्सर फुटणे, मुळव्याध, मुत्राशयातील खडे, पायातील शीर फुगणे, गर्भपिशवी काढणे, गर्भपात, सिझेरियन, संतती शस्त्रक्रिया, कानाचा पडदा बदलविणे, कानाच्या हाडाची शस्त्रक्रिया, टॉन्सील, नाकातील कोंब काढणे, नासुर, नाकातील वाढलेले हाड काढणे, तसेच दुर्बिणीद्वारे मुतखडा, पित्ताशय खडा, मेंदुच्या शस्त्रक्रिया, प्रोस्टेट, कॅन्सर, सांध्याच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांचे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, बाल शस्त्रक्रिया विभागांतर्गत अंडकोष व जागेवरील सुज, अंडकोष योग्य जागी नसणे, नाभीतील सुज, पोटातल्या गाठी व ट्युमर, नवजात बालकांचे गंभीर आजार व त्यावरील शस्त्रक्रिया, आतड्यांचे गंभीर आजार व पोटाचे आजार, किडनी व मुत्रविकार सर्जरी, किडनी व नळीमधील मुत्रखड्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. अभियानाबाबत रूग्णांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी रूग्णालय मित्रांचीही नेमणूक करण्यात आली होती. ह्या शस्त्रक्रिया अनुभवी एमसीएचएमएस तज्ञ डॉक्टरांकडून मोफत केल्या जात गेल्या. राजीव गांधी जिवनदायी योजनेचा रूग्णांना लाभ मिळवून देण्यात आला.