भोपाळ: महिन्याला केवळ ६ हजार रुपये कमविणाऱ्या एका तरुणाला इन्कमटॅक्सकडून नोटीस देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील हा तरुण आहे. रवी गुप्ता असे या तरुणाचे नाव आहे. त्याला तब्बल ३.४९ कोटींचा कर भरण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. २०११ मध्ये बँक खाते उघडण्यात आले आहे. त्यात १३२ कोटींचा व्यवहार झाले असल्याने या तरुणाला नोटीस देण्यात आली आहे. मात्र रवी गुप्ता या तरुणाने माझे पन कार्ड आणि फोटो वापरून बोगस खाते उघडून त्यातून व्यवहार करण्यात आल्याची माहिती तरुणाने दिली आहे. मी महिन्याला फक्त ६ हजार रुपये कमवीत असून मी कोणतेही बँक व्यवहार केलेले नाही असे रवी गुप्ताने सांगितले.